नीट पेपर फुटी प्रकरण; २० मे रोजी धरणे आंदोलन


नांदेड : नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने २० मे रोजी नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.

 

या आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यासाठी १८ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस

 

सुनील कदम, प्रा. प्रबुध्द चित्ते, डॉ. बालाजी पेनुरकर, तुषार देशमुख, अंकुश सावते, कैलास वाघमारे, मोहम्मद जाहिद, मुंतजिब देशमुख, सम्राट आठवले आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणी ‘नीट’चे महासंचालक अभिषेक सिंग यांच्या राजीनाम्याची त कारवाईची मागणी केली. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.


Leave a Comment

error: Content is protected !!