*आरसीसी क्लासेस पेपरफुटी व करचुकवेगिरी प्रकरणी 2000 NEET विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व दोषींवर फौजदारी कारवाई करा वंचित बहुजन आघाडीची मागणी


नांदेड :  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने ३-सूत्री कृतीचे निवेदण सादर

वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्हा आपल्या निदर्शनास आणून देत आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठे गावकर यांना CBI ने अटक केल्याने नांदेडमधील बहुजन समाजातील 2000 हून अधिक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक शोषण होत आहे. हे प्रकरण *राज्यघटना अनुच्छेद 14, 21, 21A चे उल्लंघन व संघटित आर्थिक गुन्हेगारी* आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खालील 3 -सूत्री कृती कार्यक्रमावर 7 दिवसांत कारवाईची ठाम मागणी केली आहे 

 

*. बहुजन विद्यार्थ्यांची फी व्याजासह 15 दिवसांत परत करा*  

*कायदेशीर आधार:* अनुच्छेद 21A, Consumer Protection Act 2019, MPID Act 1999.  

*कृती:* शिवराज मोठे गावकर यांची संपूर्ण संपत्ती जप्त करून लिलाव करा. *2000 विद्यार्थ्यांना 18% व्याजासह फी परत* करून जिल्हाधिकारी यांनी *‘फी परतावा कक्ष’* सुरू करावा. बहुजन मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नये.  

 

*. संचालक मंडळावर मोक्का व PMLA लावा*  

*कायदेशीर आधार:* MCOCA 1999, Public Examination Act 2024.  

*कृती:* आरसीसीच्या *सर्व संचालकांवर CBI व ED मार्फत मोक्का, PMLA, IPC 420* अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करा. ही शैक्षणिक दहशतवाद्यांची टोळी आहे.  

 

*. व्यवस्थापन कक्षाची SIT मार्फत नार्को टेस्टसह चौकशी करा*  

*कायदेशीर आधार:* Indian Evidence Act कलम 106, PMLA कलम 3.  

*कृती:* व्यवस्थापक, अकाउंटंट, शिक्षक व नॉन-टीचिंग स्टाफची *SIT नेमून नार्को व लाय डिटेक्टर टेस्टसह* चौकशी करा. वरील 3 मुद्द्यांवर 7 दिवसांत FIR व कृती अहवाल न आल्यास, वंचित बहुजन आघाडी *मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका* दाखल करेल व हजारो बहुजन पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढेल. बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.आशा ईशारा वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने दिले या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष द शंकर महाजन,जिल्हाध्यक्ष उ प्रा.राज आटकोरे जिल्हा महासचिव रवि पंडित,विनयाक गजभारे,संजय टिके,रगंनाथ गजले,रामचंद्र वंनजे,प्रकाश कोल्हे सह सर्व पदआधिकारी कार्यकर्त्ये उपस्थीत होते


Leave a Comment

error: Content is protected !!