
वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR
धर्माबाद जि नांदेड 8/में सायंकाळी मौजे माष्टी ता. धर्माबाद येथे बौद्ध वस्तीवर काही मनुवाद्यांनी गावगुंडांनी आत्मघाती हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या काही महिला भगिनीवर व बांधवांवर अमानुष मारहाण झाली आहे काहीजना गंभीर रूपाची मारहाण झालेली होती अवस्थेमध्ये आहेत ही माहिती कळताच वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन यांनी लगेच पोलीस स्टेशन येथे धाव घेतली व भीम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील भोसीकर भीम आर्मी महासचिव हर्षवर्धन कांबळे भीम आर्मीचे धर्माबाद तालुका अध्यक्ष कुलदीप मस्के या सह मारुती कांबळे व गावातील सर्व बौद्ध समाज बांधव परिसरातील समाज बांधव उपस्थित होते सायंकाळी ९ते सकाळी ५ वाजेपर्यंत पोलिस स्टेशन येथे ठाण मांडून संबंधित गावगुंडांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट महिला छेडछाड पोस्को व गंभीर स्वरूपाचे मारहाण या सर्व गोष्टीची एफ आर आय FRI दाखल करूनच पोलीस स्टेशन सोडण्यात आले यावेळी ॲडिशनल एस पी अर्चना पाटील मॅडम डीवायएसपी पाटील साहेब कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे साहेब यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य झालेला आहे व दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल झालेले आहेत




