प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर येथील अशेले पाडा परिसरात १३५ वी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी कल्याण पूर्व येथील नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी लहान मुलांना वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास उल्हासनगरमधील नगरसेविका इंदिरा निखिल पाटील, महिला वर्ग, लहान मुले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले.
या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले
