प्रतिनिधी : प्रदीप जाधव
आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गीय मुक्ताबाई दशरथ जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे निधन ३१ मार्च २०२५ रोजी झाले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व कष्टाळू वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते.

स्व . मुक्ताबाई जाधव यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
त्यामध्ये सुखदेव दशरथ जाधव, चोखाजी दशरथ जाधव, नाना दशरथ जाधव, जनार्धन दशरथ जाधव तसेच सुमन भगवान सुतार यांचा समावेश आहे.

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबियांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नातेवाईक व मित्रपरिवाराने उपस्थित राहून स्व. मुक्ताबाई जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शोकाकुल : समस्त जाधव परिवार