
पनवेल | प्रतिनिधी:- किशोर आदमाने
मराठी भाषेचा सन्मान, अस्मिता आणि वैभव जपणारा २७ फेब्रुवारी — मराठी भाषा गौरव दिन आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी साहित्याचे महान कवी, साहित्यिक व विचारवंत वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा कणा आहे. संत साहित्य, शाहिरी परंपरा, लोककला, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांत मराठी भाषेने आपला ठसा उमटवला आहे.
आजच्या काळात इंग्रजी व अन्य भाषांचा प्रभाव वाढत असताना, मराठी भाषेचे संवर्धन व जतन करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. घराघरांतून, शाळा-महाविद्यालयांतून आणि सार्वजनिक व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर व्हावा, हाच या दिवसाचा खरा संदेश आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध ठिकाणी साहित्य संमेलने, काव्यवाचन, भाषण स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.मराठी जपूया.