शेगाव तालुका: शिरसगाव निळे येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या ग्रामशाखेचे फलक अनावरण व पदाधिकारी सत्कार


बुलढाणा प्रतिनिधी;शेख हसन

युवकांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारा व गोर गरीब, वंचितांना सत्तेत बसवणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. – युवा जिल्हाध्यक्ष – अनिल वाकोडे. 

वंचित बहुजन युवक आघाडी शेगाव तालुका अध्यक्ष उमेश इंगळे व महासचिव दीपक विरघट यांच्या नेतृत्वात 

शेगाव तालुक्यातील ग्राम शाखा शिरसगाव निळे येथे ग्रामशाखा गठीत करण्यात येऊन फलक अनावरण युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या हस्ते आज दिनांक 15/2/2026 रोजी करण्यात आले यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार गौतम इंगळे, जिल्हा सदस्य तथा सरपंच शेख नासीर,युवा तालुका अध्यक्ष उमेश इंगळे युवा तालुका महासचिव दीपक विरघट,तालुका उपाध्यक्ष शेख हसन , कृष्णा गवई, किरण शेगोकर,विशाल इखारे,अशोक विरघट ,संजय पाटील,रामकृष्ण इखारे,, आनंद वीरघट सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी सर्व नवनियुक्त शाखा पदाधिकारी यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी युवकांनी कामाला लागावे असे आव्हाहन जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे यांनी केले असून

 युवकांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारा व गोर गरीब, वंचितांना सत्तेत बसवणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी असून तो कुठल्याही एका जातीचं प्रतिनिधित्व न करता संपूर्ण वंचित समुहाच नेतृत्व करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे यांनी या वेळी बोलताना केले.

या वेळी शाखा अध्यक्ष किरण शेगोकार महासचिव अजय समदूर, सचिव निलेश नाईक, संघटक शुद्धधन इखारे, यांच्या सह देवानंद इखारे, शुभम इखारे, अशोक फुलकर, संदेश विरघट,विशाल इखारे, विनोद इखारे, विजय समदूर,संदीप भोजने, नितीन इखारे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते


Leave a Comment

error: Content is protected !!