
नांदेड (दि. 25 ऑक्टोबर 2025) — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आज हॉटेल विसावा, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणतर्फे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले. चर्चेनंतर सर्वानुमते येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने आणि संघटित पद्धतीने लढवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीस राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडी, महिला आघाडीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होत.
