गायरान जमीन प्रश्न सुटणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन


बोल्डा, ता. कळमनुरी — दि. 20 ऑक्टोबर 2025


गाव बोल्डा येथे शासनाने शेतकरी बांधवांना गायरान जमीन दिली असली तरी ती जमीन पोटखराब विभागात आल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा मिळत नाही. अनेक वर्षांपासून जमीन नावावर असूनही तिचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर बोल्डा येथील शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयात भेट देत तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत गायरान जमीन प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.

या प्रकरणात राजू कांबळे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, “शासन दरबारी हा प्रश्न नेऊन एका महिन्याच्या आत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

👉 बोल्डा गावच्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचा निर्धार दृढ दिसून येतो.


Leave a Comment

error: Content is protected !!