गायरान जमीन प्रश्न मार्गी लागणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन 🌾



.

कळमनुरी, दि. 17 ऑक्टोबर 2025 —
गाव पावणमारी आणि वाकोडी येथील शेतकरी बांधवांनी गायरान जमीन विषयक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयाला भेट दिली.

पावणमारी गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गायरान जमीन गेल्या 60 वर्षांपासून त्यांच्या ताब्यात असली तरी ती अद्याप नावावर झाली नाही, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

तर वाकोडी येथील शेतकऱ्यांनी म्हटले की, शासनाने जमीन दिली असली तरी ती ‘पोटखराब’ दाखल असल्याने कोणतीही सुविधा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

या सर्व तक्रारींची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा केली.
ते म्हणाले, “हा प्रश्न शासन दरबारी अंतिम टप्प्यात असून एका महिन्यात कायमस्वरूपी तोडगा निघेल. वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

या प्रसंगी शेतकरी बांधवांनी संघटनेच्या प्रयत्नांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!