
.
पुणे – वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून होत असलेल्या जातीय आणि अन्यायकारक वर्तनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावर जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन करण्यात आले असून, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासन व ट्रस्टींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
१. प्रेम बिऱ्हाडे यांना त्वरित न्याय मिळावा.
२. मॉडर्न कॉलेज प्रशासन व संबंधित ट्रस्टींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असून, शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 , सकाळी 11:30 वा, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेने सर्व विद्यार्थी, पालक आणि सजग नागरिकांना आवाहन केले आहे की, “शिक्षणात समता आणि विद्यार्थ्यांना न्याय — हाच आमचा संघर्ष” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या अन्यायाविरोधातील लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.




