
मुंबई:-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार करत, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
या तयारीचा एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत निवडणूक प्रचार यंत्रणांचा प्रभावी वापर, स्थानिक प्रश्न, पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत कसे पोहोचवावेत, तसेच पुढील संभाव्य आव्हानांवर कसे मात करावी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई, सर्व आघाड्यांचे महासचिव, प्रभाग समन्वयक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.