गायरान जमिनीचा प्रश्न कायमचा सुटला — फॉर्मर आयडी मिळवणारे जिल्ह्यातील पहिले गाव; आता सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार!



प्रतिनिधी : धम्मा कांबळे ता. कळमनुरी : गावातील शेतकऱ्यांनी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांचे मानले आभार व केला सत्कार…!
कळमनूरी तालुक्यात असणारे बऊर गावातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जमिनी वाटप केल्या होत्या परंतु ह्या जमिनी गेली कित्येक वर्षापासून पोट खराब मध्ये व भोवतदार 02 मध्ये क्षेत्र असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा पीक कर्ज,पिक नुकसान भरपाई ,फॉर्मर आयडी, शासनाच्या इतर कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. हा प्रश्न शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय येथे जनता दरबारी आणला. गेली एक वर्षापासून सतत या अडचणीचा पाठपुरावा करून आज रोजी अधिकृत शासनाने या जमिनीतील क्षेत्रफळांना आकारणी देऊन, पोट खराब मधून वहीती क्षेत्र शासनाने केले. हा प्रश्न शेतकऱ्यांचा कायमचा सुटलेला आहे.आता शासनाच्या इतर सुविधांचा पुरेपूर लाभ मिळेल. भोगवतदार 02 मधुन 01 मध्ये घेण्याचे प्रक्रिया व हे शेतकरी कायमच्या या जमिनीचे मालक करण्याची प्रक्रिया सुरू असून हा ही प्रश्न कायमचा सुटून जाईल. कळमनुरी तालुक्यातील इतर गायरान जमीन धारक या सर्वांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कळमनुरी याच्याशी संपर्क साधून हा प्रश्न जनता दरबारी घेऊन यावा असे विनंतीपूर्वक आव्हान मी माझ्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करीत आहे…!

आपलाच
राजू कांबळे
( तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी., कळमनुरी )


Leave a Comment

error: Content is protected !!