उमरा (ता. लोहा) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना


उमरा, ता. लोहा — येथे आज अत्यंत मंगल वातावरणात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पुज्य भन्ते बि. संघपालजी महाथेरो (व्यवस्थापक चैत्यभूमी तथा अध्यक्ष, भिक्खू संघ – भारतीय बौद्ध महासभा) यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी उपस्थित नागरिक, बौद्ध बांधव आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी “बुद्धं शरणं गच्छामि” या जयघोषात परिसर दुमदुमविला.
भन्ते संघपालजी यांनी या प्रसंगी धम्म, करुणा आणि मैत्री यांचा संदेश देत बौद्ध धम्माच्या शिकवणींचे दैनंदिन जीवनात पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक बुद्धिस्ट समिती, ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले.


Leave a Comment

error: Content is protected !!