भास्कर कुळवंत यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश


परतूर ता. प्रतिनिधी : दिपक नाटभजन
जालना – वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेने प्रेरित होऊन भास्कर कुळवंत यांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्याला जालना जिल्हा निरक्षक नागोराव पांचाळ, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक भाऊ डोके तसेच जिल्हाध्यक्ष डेविड दादा घुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भास्कर कुळवंत यांचे मनःपूर्वक स्वागत केले. पक्षात प्रवेश करून त्यांनी समाजाच्या न्याय, समानता आणि परिवर्तनाच्या लढ्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेची ताकद अधिक बळकट होईल, असे मत या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!