नांदेडमध्ये गॅस टंचाईवि
📍 नांदेड | प्रतिनिधी धम्मानंद कांबळे
आज वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना घरगुती गॅस, एलपीजी, सीएनजी आणि पेट्रोलच्या वाढत्या टंचाईबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी गॅसच्या काळाबाजारावर तात्काळ आळा घालण्याची आणि गैरमार्गाने घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, गॅसचे घरपोच वितरण सुरू करावे, अशी ठाम मागणी आघाडीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, शंकर महाजन, जिल्हा महासचिव दिपक रुद्राजी मगर यांच्यासह रवी पंडित, के.एच. वने, यशपाल ढवळे, प्रल्हादराव हिंगोले, संजय टिके, सिद्धांत पवळे, प्रकाश कोल्हे, बालाजी सावंत, अरुण भद्रे, रंगनाथ गजले, विनोद वाघमारे आदी उपस्थित होते.




