कळमनुरी नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी


 

कळमनुरी : नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.  हम बोले सो हुकुमशाही, हम बोले सो कायदा वंचित बहुजन आघाडी हा शिवसेना शिंदे गटाचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.  कळमनुरी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा जाणीवपूर्वक गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.

हम बोले सो हुकुमशाही, हम बोले सो कायदा वंचित बहुजन आघाडी हा शिवसेना शिंदे गटाचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही…!

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपरिषद निवडणूक सन 2025 मध्ये नगराध्यक्ष पद हे महिला आरक्षणासाठी राखीव होते. या निवडणुकीत सौ. आश्लेषा वैभव चौधरी यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मात्र, त्यांच्या पती वैभव लक्ष्मणराव चौधरी (उर्फ आर.आर. पाटील) हे स्वतःच्या नावासमोर “नगराध्यक्ष” पद लावून सोशल मीडिया, सार्वजनिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम व विविध माध्यमांतून स्वतःची ओळख नगराध्यक्ष म्हणून करून देत आहेत.

हा प्रकार महिला आरक्षणाचा उद्देश धुळीस मिळवणारा असून “प्रॉक्सी कारभार” असल्याचा आहे. तसेच नगराध्यक्षा स्वतःही या प्रकारास समर्थन देत असल्याने जनतेची दिशाभूल होत असून बेकायदेशीर हा प्रकार संबधित नगराध्यक्षा व त्यांचे पती करीत आहेत.

संबंधित नगराध्यक्षा यांच्या पतीकडून Facebook, Instagram, WhatsApp आदी सोशल मीडियावर स्वतःला नगराध्यक्ष म्हणून दर्शवून जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरविला जात आहे. तसेच सन 2026 चे कॅलेंडर छापून त्यावरही “नगराध्यक्ष” पदाचा उल्लेख करून मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे.

यामुळे भारतीय दंड संहिता कलम 419, 420, 171 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात याव. संबंधित सोशल मीडिया खात्यांवरील पुरावे नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ ते जप्त करून दोषींवर FIR नोंदवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 नुसार नगराध्यक्ष पदाचे अधिकार इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नसल्याचे स्पष्ट असूनही महिला हक्क भंग केल्या जात असून हा प्रकार सुरू असल्याने हा कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे निवडून आलेल्या महिला प्रतिनिधीच्या अधिकारांवर छाया पडत असून निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याला बाधा पोहोचत आहे,याचा गैरफायदा नगराध्यक्ष व त्यांचे पती घेत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात नगराध्यक्षा व त्यांच्या पती दोघांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अनाधिकृत हस्तक्षेप तात्काळ थांबवावा तसेच भविष्यात अशा प्रकारच्या प्रॉक्सी कारभारास आळा घालण्यासाठी कठोर निर्देश जारी करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जि.अ.योगेश नरवाडे,मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे,युवा ता.अध्यक्ष मोहम्मद असलम,दिनेश पाईकराव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.जर २ दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!