
शहर कळमनुरी :-नरायणा पब्लिक स्कूल कळमनुरी यांनी RSS संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण घेतल्या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी कळमनुरी यांच्या चौकशी मध्ये प्रथम दर्शनी कारवाई दोषी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर…!
नारायणा पब्लिक स्कूल कळमनुरी यांना RSS संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण घेतल्यामुळे 02 दिवसात लेखी म्हणणे सादर करण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी,हिंगोली यांच्याकडून नोटीस..!
07 दिवसात अंतिम कारवाई न केल्यास 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या दालनात जबाब दो आंदोलन..!
कळमनुरी शहरात असणारे नारायना पब्लिक स्कूल, सेठ नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणारे या शाळेवरती आरएसएस संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना धार्मिक जातीवादी प्रशिक्षण दिल्या जात होतं या संदर्भात वंचित बहुजन आघाडी कळमनुरी यांना हि माहिती मिळताच सर्व टीमच्या वतीने सदरील प्रशिक्षण सुरू असताना शाळेचा जायमौका केला असता 03 दिवसापासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आरएसएस सारख्या जातीवादी संघटनेचे धार्मिक प्रक्षीषण देतानाची गंभीर बाब आढळून आली.त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी यांना दिनाक 03/11/2025 रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी समिती नेमून सदरील प्रकरणात गटशिक्षण अधिकारी, कळमनुरी यांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु कारवाई होत नसल्यामुळे

दिनाक 05 फेब्रुवारी 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी कडून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व याची गंभीर दखल घेऊन कळमनुरी गट शिक्षणाधिकारी यांनी त्वरित या प्रकरणाची चौकशी करून सदरील धार्मिक प्रक्षीषण कार्यक्रम झालेला असून समोरील कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा शिक्षण अधिकारी,हिंगोली यांना देण्यात आल्यानंतर 02 दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी नारायणा पब्लिक स्कूल अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना नोटीसद्वारे दिले आहेत. म्हणून आज रोजीचे तात्पुरते आंदोलन रद्द करून सदरील प्रकरणात 07 दिवसाच्या आत अंतिम कारवाई करावी, न केल्यास वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जबाब दो आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे,युवा ता.अ.मोहम्मद असलम,दिनेश पाईकराव ,समाधान पाईकराव यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिला आहे.




