विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..


 प्रतिनिधी: बळीराम कांबळे 

ता जळकोट जि लातूर.

प्रती वर्षाप्रमाणे दि. 01/08/2026 रोजी पिताश्री रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय व माता गिरीजा जी. एन.एम.नरसिंग कॉलेज हळदवाढवणा 

ता जळकोट येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्सहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यमलवाड सर व प्रमुख पाहुणे जाधव सर हे होते.प्रथमता कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे आणि सर्व कर्मचारी वर्गानी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी ढवळे या विद्यार्थिनी केले यावेळी रूपाली गवळे या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करून एक गीत सादर केले कांबळे सर यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याचे स्मरण केले,

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरींच्या माध्यमातून समाजातील वंचित शोषित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली, त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली असून त्यांच्या विचारांचा आजही समाजाला मार्गदर्शन करणारा वारसा आहे असे यावेळी व्यक्त केले…

त्या नंतर प्राध्यापक गवाले सर यांनी अभिवादन करून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करून माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड सादर करून उपस्थितांचे मने जिंकली 

प्रमुख पाहुणे जाधव सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आपले मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यमलवाड सर यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे सांस्कृतिक चळवळ याविषयी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पिताश्री रावसाहेब पाटील कॅम्पस येथील विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते आभार प्रदर्शन भाजीपाले सर यांनी केले…….


Leave a Comment

error: Content is protected !!