
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे
मौजे रुई इंदापुर येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी श्री बाबीर विद्यालय, रुई ता. इंदापूर येथे कै. आत्माराम बाबुराव पाटील यांची पुण्यतिथी , तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या तिन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून ड्रेस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
या संस्थेचे संस्था
पक कै. आत्माराम बाबुराव पाटील यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त हुशार,गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील, माजी सरपंच यशवंत कचरे, विष्णू मारकड, आकाश कांबळे,डॉ. संभाजी मारकड,माजी डेप्युटी सरपंच बबन मारकड, रुई सोसायटीचे चेअरमन लालासो दगडे, महादेव माने, बापूराव लावंड (चेअरमन )अंकुश लावंड, मोहन लावंड, ग्राम विकास अधिकारी पवार भाऊसाहेब, चक्रधर कायगुडे,शेखर पाटील, अभयसिंह पाटील, सतीश झेंडे, शिवाजी कांबळे,आबासो थोरात, तानाजी मारकड, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे,ज्येष्ठ शिक्षक सुनील दराडे, सहशिक्षिका मीरादेवी पाटील, प्रतीक्षा पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते ड्रेसचे वाटप करण्यात आले.
यावेळी खालील दानशुरांनी हुशार,होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेस साठी मदत केली त्यामध्ये डॉक्टर आजबे,डॉक्टर संभाजी मारकड यांचे कामधेनु परिवार 11 ड्रेस, समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेली सुजाता जगन्नाथ पाटील यांचे तर्फे 15 ड्रेस, कल्याणी इरिगेशन (सिबू गावडे )2 ड्रेस, हॉटेल अचानक चे मालक अविनाश मारकड 2ड्रेस डॉ. महेश मारकड 2ड्रेस अशाप्रकारे हुशार,होतकरु विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ड्रेस देण्यात आले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वरील तिन्ही थोर नेत्यांबद्दल आपल्या भाषणामध्ये यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आकाश कांबळे, आबासाहेब थोरात यांनी विद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. व भाऊंचे कार्य विषद केले.
या वेळी सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका गुरुकुल स्टाफ व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या मुलींनी केले, तर आभार पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी मानले .