दि. 01.05.2026
कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर गावामध्ये संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त जयंतीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष राजू भाऊ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष राजू भाऊ कांबळे,माथाडी प्र.जि.अ.बाबारावजी थोरात,युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद असलम,युवा ता.महासचिव दिनेश पाईकराव,प्रश्नात रणवीर,अमोल पुंडगे,हे उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानी शितळे सर म्हणून होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चितळे यांनी केले. यावेळी भीम जयंती मंडळ सुकळी (वीर) अध्यक्ष धाराजी शीतळे उपाध्यक्ष – सुभाष शीतळे कार्यक्रमाचे अध्यक्ष – बंडू शीतळे सर, लखन हनुमंते, तथागत शीतळे ,अजिंक्य इंगोले, प्रशांत शीतळे,रक्षपाल शीतळे,भारत शीतळे विनोद शीतळे,किरण शीतळे,पवन शीतळे ,राधाकिशन शीतळे व समस्त गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.





