
पनवेल:पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी, प्रांत कार्यालय, पनवेल येथे
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर
राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविरुद्ध घोषणांच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी चुल पेटवून त्यावर भाकरी बनवून ती प्रशासनाला खाऊ घातली आणि त्यांना थेट सवाल विचारण्यात आला की गोरगरीब जनतेवर जो आता अन्याय होतोय तो कधी बंद होणार.
सदर आंदोलन वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष ॲड. हेमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर शिष्टमंडळाने सदर मागणीचे पत्र माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात आले.
सदर प्रसंगी वंचित बहुजन आघाडी निरीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा डॉ. सुशिम सकपाळ, पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. छायाताई शिरसाट, कविता वाघमारे, सतीष अहिरे, महासचिव संतोष मुजमुले, अविनाश अडागळे, सचिव राजेश रणधीरे, संघटक भागुराम भेकरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, प्रवक्ते कुमार मेटांगे, आणि कार्यकारणी,वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, महासचिव अक्षय उबाळे, प्रसिद्धीप्रमुख अभिजीत कांबळे, आणि कार्यकारणी,
वंचित बहुजन आघाडी,
खारघर शहर अध्यक्ष व कार्यकारणी,
नावडे शहर अध्यक्ष व कार्यकारणी,
कळंबोली शहर अध्यक्ष व कार्यकारणी,
कामोठे शहर अध्यक्ष व कार्यकारिणी,
खांदा कॉलनी शहर अध्यक्ष व कार्यकारणी
नवीन पनवेल शहर माजी पदाधिकारी
पनवेल तालुका अंतर्गत उलवे नोड अध्यक्ष व कार्यकारणी
तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, आणि नागरिकांनी सदर आंदोलनामध्ये आपली उपस्थिती नोंदवली.




