
चितळी : दि. 05-04-2026 रोजी चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या मेळाव्यास राज्य नेत्या उत्कर्षा रुपवते, ॲडवोकेट आम्रपालीताई निकम तसेच जिल्हा नेत्या शैलेजाताई ब्राह्मणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले.

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शौकत भाई पठाण, सलीम भाई शेख, सुभाष भाऊ ठुबे यांचे विशेष योगदान राहिले.

तसेच, वैयक्तिक दुःख असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या युवा जिल्हा नेते सुनील भाऊ वाघमारे यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी बाळाभाऊ गायकवाड, बंटी भाऊ पगारे, राहुल भाऊ ठोंबरे, महेश भाऊ पाखरे, विलास भाऊ अहिरे, अविनाश भाऊ गोरे, योगेश भाऊ गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.




