बारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास बारूळ मंडळातील जनतेचा मोठा प्रतिसाद


नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.

 बारूळ :महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधार तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत महसूल विभागाचे विधी योजना व सेवा नागरिकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. सदर शिबिर महादेव मंदिर बारूळ येथे मंडळाचे सर्व सज्जातील गावातील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी कंधार विलास नरवटे साहेब, तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

 

दिनांक 7 मार्च 2026 रोजी प्रमुख पाहुणे तहसीलदार कंधार श्री रामेश्वर गोरे सर नायब तसिलदार भोसीकर साहेब, मोदीराज साहेब, पावडे साहेब आरोग्य विभाग डॉक्टर साखरे सर ,मृदू व जलसंधारण इंजिनीयर गायकवाड साहेब शिक्षण विभाग विस्तार अधिकारी श्री पाटील सर तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख बळवंत नरवटे साहेब माहिला व बाल विकास चे श्री राजुरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग श्री सुमित पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री पशुसंवर्धन विभाग प्रतिनिधी हजर होते सदर शिबिरात सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाशी संबंधित माहिती उपस्थित नागरिकांना दिली कार्यक्रमाचे प्रस्तावित तहसीलदार साहेब श्री रामेश्वर गोरे यांनी केले व सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी पी ए मुंडे यांनी केली सदर कार्यक्रमांमध्ये बारूळ महसूल मंडळातील शेतकरी शेतकरी व ग्रामस्थ त्यांना सर्व विभागातील विविध प्रमाणपत्रे, सातबारा आठ अ शिधापत्रिका वाटप करण्यात आले सदर शिबिरामध्ये प्रत्येक विभागाचे स्टॉल करण्यात आले होते त्या स्टॉलमध्ये प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनी बारूळ मंडळातील आलेले शेतकरी यांचे विभागाशी संबंधित प्रश्नाविषयी माहिती दिली लोकांचे अर्ज घेतले व कामा विषयी मार्गदर्शन केले. व बारूळ गावातील दिगंबर पाटील वडजे, महाजन कांबळे, ग्रामविकास अधिकारी आदमपूरकर साहेब, तलाठी मुंडे साहेब, शब्बीर शेख , बाबू साहेब, पोलीस पाटील संजय पाटील जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद पाटील वळशिंगे, मारुती पाटील मजरे, उदय पाटील जाधव, तेलूरचे पोलीस पाटील अमोल पाटील, बारूळ आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स 102 चे चालक गोविंद पाटील इंगळे, व बारूळ मंडळातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजक बारूळ महसूल मंडळ यांच्या मदतीने पार पाडले.


Leave a Comment

error: Content is protected !!