
नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर
शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चाचे प्रमाण कमी करावे व जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांनी बारूळ तालुका कंधार येथे दिनांक 14 रोजी आयोजित” विज्ञान संत श्री अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व अनुभव कथन शेतकरी मेळाव्यात” मार्गदर्शन करताना केले.
ते पुढे म्हणाले, शेतीत रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी कडक बनली असून सुपीकता कमी झाली त्यामुळे घरच्या घरी कमी खर्चात शेतात लागणारे अमिनो ऍसिड व मायक्रो न्यूट्रॉन तयार करून वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन खर्चात प्रचंड बचत होते असा दावा केला.
यासाठी जमिनीत गांडूळ वाढीसाठी प्रोटीन व सूक्ष्म अन्नद्रव्य कसे तयार करावे याची प्रात्यक्षिके दाखवली व किमतीची तफावत सांगितली.
प्रारंभी बारूळ कृषी मंडळाचे कृषी पर्यवेक्षक श्री परमेश्वर मोरे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली .त्यात सेंद्रिय शेती, पांदण मुक्त शेती , नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत माहिती दिली.सदर
शेतकरी मेळावा बारूळ येथील लहिजा शेतकरी स्वयंसहाय्यता समूहातर्फे आयोजित केला होता.यावेळी डॉ. कहाळेकर, कृषी पर्यवेक्षक श्री परमेश्वर मोरे, अनिल पाटील सह बारूळ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.