
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर.
आज देशभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे बारूळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा व समतेसाठी केलेल्या कार्यावर चिमुकल्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी कविता, नाट्यछटा व विचार मांडून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समानतेचा संदेश देण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांनी जोतिबा फुले यांच्या सोबत भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाचा नवा मार्ग खुला केला. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला दिशा देत आहे.

शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी बाल सावित्रीबाईच्या वेशभूषेत आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम अधिकच सुंदर बनवला.
या कार्यक्रमाची सुरूवात शाळेचे मुख्याध्यापिका मारतळे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरवाडे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित जी एस वाघमारे सर कौशल्य सर मोरे सर घोरबांड सर काकडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी व शाळेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार साहेबराव कौशल्य सर यांनी केले.