
.
ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन
आज दिनांक 3 जानेवारी २०२६ रोजी जि.प.प्रा.शा. पांडेपोखरी येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. हि पाककला स्पर्धा श्री सावंत सर हे गेल्या बारा वर्षापासून घेत आहे. आजचे त्यांचे हे तेरावे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये एक मुलगा व एक मुलगी मिळून 45 मिनिटात आपली पाककृती म्हणजेच जो नियोजित मेनू आहे तो तयार करायचा असतो. या पाककलेमध्ये विद्यार्थी हिरीरीने भाग घेतात. मोठा आनंद त्यांच्यामध्ये भरलेला असतो. पाक कलेतून स्त्री पुरुष समानता, लिंग भेद समभाव, श्रम प्रतिष्ठा, स्व ची जाणीव, निर्णय क्षमता, खिलाडू वृत्ती , सृजनशीलता, इत्यादी गुणांचा विकास होतो. या कार्यक्रमासाठी प्रा.शा.पांडेपोखरी शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली, नियोजन केले. श्री गायकवाड सर, श्री काटे सर, श्री काटकर सर, श्री बादाडे सर, श्रीमती भागवत मॅडम, श्रीमती मुदिराज मॅडम, या सर्व मंडळींनी व शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी सुद्धा हातभार लावला. या कार्यक्रमासाठी आष्टी केंद्राच्या गट समन्वयक श्रीमती शिंदे मॅडम ह्या उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमाची परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.कार्यक्रमाची वेळ ही 45 मिनिटांची होती.
ह्या वेळेत विद्यार्थ्यांना आपली कलाकृती, आपले नियोजन ,आपला मेनू हा इतरांपेक्षा चांगला कसा बनेल आणि चविष्ट कसा राहील याकडे लक्ष द्यायचे होते आणि ते त्यांनी चांगल्या प्रकारे केले. आलेल्या एकवीस जोड्यांमधून अनुक्रमे 3 क्रमांक विजेत्यां स्पर्धकासाठी काढण्यात आले. प्रथम क्रमांक हा अंकिता आणि अभिषेक या जोडीचा आला त्यांनी आलू भाजी आणि पुरी ही अत्यंत उत्कृष्टरित्या आणि सजावटीने भरपूर अशी चविष्ट बनवली. त्यानंतर दुसरा क्रमांक दिव्या आणि ऋषिकेश यांचा आला. यांनी तयार केलेलि खिचडी अगदी चविष्ट अशा प्रकारची होती.तिसरा क्रमांक हा कांचन आणि प्रेम या जोडीचा आला.यांनी दुधाची खीर आणि पुरणपोळी हा मेनू तयार केला होता अत्यंत उत्कृष्टरित्या चविष्ट अशी पुरणपोळी या जोडीने तयार केली होती. अशाप्रकारे सर्व शिक्षक वर्गातून या पाककला स्पर्धेचे, स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. सहभाग विद्यार्थी खालील प्रमाणे आहे. पूजा ,समर्थ अंजली, कुनाल , दिशा, नितीक,अश्विनी साहिल ,भक्ती, संस्कार, अल्फीया, शहाबाज,कल्याण ,अजिंक्य , कांचन, प्रेम,श्रद्धा ओंकार ,प्रीती ,वेदांत ,श्रुती संभाजी, तेजल, दत्ता ,समृद्धी पृथ्वीराज, कल्याणी ,सार्थक शिल्पा, पार्थ ,अंकिता, कृष्णा आयेशा, जुनेद ,भक्ती ,हार्दिक विद्या, पुरुषोत्तम इत्यादी मुलांनी सहभाग नोंदवला.