शेवगा (ता. परतूर) गावात बिबट्याचा वावर; वन विभागाने दिली सुरक्षा व सतर्कतेची माहिती


 

 

ता. परतूर प्रतिनिधी – दिपक नाटभजन

परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षाविषयक सूचना दिल्या.

 

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी

४.३० वाजता सुधाकर धुमाळ यांना

संजय शिवाजी धुमाळ यांच्या गट क्र. २१८ मधील शेतात बिबट्या दिसला आणि लागेल परतूर वन विभागाला कळविले.  परतूर वन विभागाचे अधिकारी एम. एम. डब्ल्यू. सय्यद (वनरक्षक, परतूर), वनमजूर आत्माराम राठोड, तसेच एम. एस. शेख यांनी शेवगा व आसपासच्या परिसराची पाहणी केली.

 

यावेळी गावातील दत्ताराव धुमाळ, नामदेव धुमाळ मारुती धुमाळ, सतीश धुमाळ, प्रवीण धुमाळ, गंगाधर धुमाळ, साळीकराम धुमाळ, राजेभाऊ धुमाळ, कारभारी धुमाळ, महादेव धुमाळ, अतिश धुमाळ, महेश धुमाळ, रघु सोळंके, प्रदीप धुमाळ, शरद धुमाळ, जनार्धन धुमाळ, मोहन धुमाळ, वैभव धुमाळ, ओम धुमाळ, आबा धुमाळ, शिरंग धुमाळ, बाजीराव धुमाळ तसेच इतर ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना बिबट्याच्या हालचालीबाबत विश्वसनीय माहितीवरच विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. तसेच ऊसतोड कामगारांना स्वरक्षण कसे करावे, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली.

 

ग्रामस्थांना विशेषतः जनावरे, बैल, गाई-शेळ्या सुरक्षितपणे गोठ्यात बांधून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वन विभागाने पुढील काही दिवस गावकरी सतर्क राहावेत, संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे


Leave a Comment

error: Content is protected !!