
पिंपरी-चिंचवड / पुणे :
नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SRA विरोधात विराट धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मोर्चादरम्यान SRA कार्यालयासमोर नागरिकांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांना SRA प्रशासनाने त्वरित मान्यता दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
🔹 पिंपरी-चिंचवडमधील पाच वर्षांपासून रखडलेले SRA प्रकल्प नियमांतर्गत तातडीने सुरू करण्याची मागणी.
🔹 पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील SRA प्रकल्पग्रस्तांना दरमहा ₹15,000 घरभाडे देण्याची मागणी.
🔹 चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना अपात्र ठरवणे थांबवावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांच्या वतीने या मागण्या मांडल्यानंतर SRA प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

या मोर्चात नागरिक, महिला, युवक व वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणाऱ्या या आंदोलनाचे यशस्वी समारोपानंतर *“जय भीम, जय संविधान”*च्या घोषणा देत वातावरण दुमदुमले.