चलो नवी मुंबई – निर्धार मेळावा २०२५, वंचित बहुजनांचा उत्साही प्रतिसाद


नवी मुंबई | प्रतिनिधी प्रदीप जाधव

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘चलो नवी मुंबई – निर्धार मेळावा २०२५’ हा भव्य कार्यक्रम नवी मुंबईतील ऐरोली येथे येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजातदादा आंबेडकर प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा ऐरोली येथील लक्ष्मी नारायण म्हात्रे हॉल, ऐरोली स्पोर्ट असोसिएशनच्या बाजूला, सेक्टर ८अ, नवी मुंबई (४००७०८) येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू असून, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सामाजिक न्याय, बहुजन एकता आणि राजकीय परिवर्तनाच्या दिशेने ठोस भूमिका मांडण्यासाठी या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या मेळाव्याद्वारे तरुणाईला संघटन, संघर्ष आणि परिवर्तनाचा नवा संदेश दिला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर चे सोशल मीडिया प्रमुख राहुल चव्हाण यांनी सर्वांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे


Leave a Comment

error: Content is protected !!